सोनाली खरेच्या पतीने काजोलच्या प्रसिद्ध चित्रपटात केले आहे काम, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:52 PM2021-01-20T15:52:35+5:302021-01-20T15:53:23+5:30

सोनाली खरे आणि या अभिनेत्याची एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान ओळख झाली होती.

marathi actress sonali khare married to bijay anand | सोनाली खरेच्या पतीने काजोलच्या प्रसिद्ध चित्रपटात केले आहे काम, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता

सोनाली खरेच्या पतीने काजोलच्या प्रसिद्ध चित्रपटात केले आहे काम, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्देबिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरेने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर नुकताच तिच्या पतीसोबतचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. 

बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने बिजयने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर काही कालावधीनंतर त्याने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. काही काळ मालिकांमध्ये काम केले. 

१९९८ साली औरत मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर २००२ साली रामायणमध्ये त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता. अचानक पुन्हा एकदा त्याने मालिकेतून कमबॅक केले. दिल ही तो है या मालिकेत मुख्य भूमिका साकारून पुनरागमन केले. त्यानंतर सिया के राम मालिकेत त्याने राजा जनकची भूमिका साकारली होती. अभिनयातून ब्रेक घेतल्यावर त्याने योगाभ्यासचे ट्रेनिंग घेतले आणि स्वतःचे योगा सेंटर सुरू केले. अभिनयातून वेळ काढत तो योगा शिबिरही घेत असतो.

Web Title: marathi actress sonali khare married to bijay anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.