श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:41 PM2021-12-03T16:41:35+5:302021-12-03T16:42:20+5:30

Shriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actress shriya pilgaonkar follow Badshah Jugnu song trend | श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा

श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लाडकी जोडी म्हणजे सचिन पिळगावकर (sachin pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर (supriya pilgaonkar). सतत चेहऱ्यावर गोड हसू असणारी ही जोडी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांची आवडती आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर या दोघांची कायम चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे त्यांच्याप्रमाणेच त्यांची लेक श्रिया पिळगावंकरदेखील (shriya pilgaonkar) कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते.  अलिकडेच श्रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सध्या ती चर्चेत येत आहे.
 

सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. विशेष म्हणजे श्रियाने थोडासा हटके पद्धतीने हा ट्रेंड फॉलो केला असून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

सध्या सोशल मीडियावर बादशाहचं जुगनू गाणं लोकप्रिय होत असून  अनेक जण या गाण्यावर इन्स्टा रिअल करत असतात. असाच व्हिडीओ श्रियाने केला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये लहानपणी सगळ्यांना आवडणारं स्नॅक्स खातांना दिसत आहे. हे स्नॅक्स वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. काही जण त्याला पुंगळ्या म्हणतात, तर काही जण नळ्या म्हणतात. विशेष म्हणजे हाच पदार्थ खाऊन श्रियाने तिचा ट्रेंड फॉलो केला आहे.

दरम्यान, श्रिया मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ती कलाविश्वात तिचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.
 

Web Title: marathi actress shriya pilgaonkar follow Badshah Jugnu song trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.