सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही मराठी अभिनेत्री म्हणते, मी मज हरपून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 07:00 AM2020-03-14T07:00:00+5:302020-03-14T07:00:00+5:30

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते

Marathi actress prajakta mali looks stunning in saree gda | सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही मराठी अभिनेत्री म्हणते, मी मज हरपून

सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही मराठी अभिनेत्री म्हणते, मी मज हरपून

googlenewsNext

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ  अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही प्राजक्ता माळी आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.


प्राजक्ताने इंस्टाग्रामवर साडीतील आरशासमोर बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिचा अंदाज कोणालाही घायाळ करेल असाच आहे. प्राजक्ताने गाण्याच्या काही ओळी फोटोला कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग...साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग...मी मज हरपून... सोशल मीडियावर तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.


अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

Web Title: Marathi actress prajakta mali looks stunning in saree gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.