ही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:04 PM2021-01-28T12:04:53+5:302021-01-28T12:06:12+5:30

या अभिनेत्रीने नुकताच तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती तिच्या आई-बाबांसोबत दिसत आहे.

marathi actress pooja sawant childhood picture | ही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

ही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोत पूजा खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. याच फोटोसोबत तिने तिचा आणि तिच्या आईवडिलांचा त्याच पोझमधला आताचा फोटो शेअर केला आहे.

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर'मध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. 

पूजाने नुकताच तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती तिच्या आई-बाबांसोबत दिसत आहे. या फोटोत पूजा खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. याच फोटोसोबत तिने तिचा आणि तिच्या आईवडिलांचा त्याच पोझमधला आताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले आहे की, वेळ कशी उडून जाते हेच कळत नाही... मला पुन्हा छोटे बनायचे आहे... 

पूजा आज जितकी सुंदर दिसते तितकीच ती लहानपणीदेखील दिसत अस हेच हा फोटो पाहून तिचे चाहते सांगत आहेत. हा फोटो पूजाने शेअर केल्यानंतर केवळ एका दिवसांत या फोटोला ७७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.  

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने महिला माहूताची भूमिका साकारली होती.

Web Title: marathi actress pooja sawant childhood picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.