'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:46 PM2022-05-13T17:46:12+5:302022-05-13T17:46:43+5:30

Namrata sambherao: कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवणाऱ्या नम्रताने अलिकडेच तिच्या जवळच्या व्यक्तीसाठी पोस्ट लिहिली आहे.

marathi actress namrata sambherao share special post for husband on wedding anniversary | 'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट

'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट

Next

आपल्या सहज सुंदर अभिनयशैलीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता आवटे-संभेराव ( namrata sambherao ). अनेक मालिका, रिअॅलिटी शो, चित्रपट अशा विविध माध्यमातून नम्रता कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. कलाविश्वाप्रमाणेच ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अलिकडेच तिने तिच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्टही शेअर केली.

"प्रिय योगेश, नवरा बायको म्हणून आपल्याला आज 9 वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 'कसला handsome आहेस यार तू', असं मी त्याला म्हणले कि, 'तू काय कमी सुंदर आहेस मग', असं म्हणून मला उगाचच सातवे आसमाँ पे चढवणारा माझा नवरा वेळोवेळी मला प्रोत्साहन देत आलाय साधारण डिलिव्हरी नंतर आई झाल्यावर काम सुरु करायला एक मोठा काळ जातो पण अगदी 3 महिन्यात लगेच मी त्याच उत्साहाने कामासाठी,करिअरसाठी सज्ज झाले. त्याचं मूळ कारण म्हणजे योगेश. असाच सोबत रहा मला सहन करत रहा I love you so much yogi काही होउ दे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे," अशी पोस्ट नम्रताने शेअर केली आहे.

दरम्यान, नम्रताने 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. इतकंच नाही तर 'बाबू बँड बाजा', 'व्हेंटिलेटर' या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.

Web Title: marathi actress namrata sambherao share special post for husband on wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app