माझ्या आयुष्यातले सैराट दिवस..., म्हणत अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, तुम्ही ओळखलंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:51 PM2022-05-27T12:51:07+5:302022-05-27T12:51:38+5:30

Major throwback : फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत? गोड बोलका चेहरा, तितक्याच सहज सुंदर अभिनयासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. ती अभिनेत्री आहे, लेखिका आहे शिवाय गायिका  आणि संगीतकारदेखील आहे.

marathi actress amruta subhash share her throwback photos | माझ्या आयुष्यातले सैराट दिवस..., म्हणत अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, तुम्ही ओळखलंत?

माझ्या आयुष्यातले सैराट दिवस..., म्हणत अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, तुम्ही ओळखलंत?

googlenewsNext

फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत? गोड बोलका चेहरा, तितक्याच सहज सुंदर अभिनयासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. ती अभिनेत्री आहे, लेखिका आहे शिवाय गायिका  आणि संगीतकारदेखील आहे. आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या फोटोतील या अभिनेत्रीला अद्यापही तुम्ही ओळखलं नसेल तर तिचं नाव आहे, अमृता सुभाष (Amruta Subhash). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ही प्रतिभावंत अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रीय आहे. तिनं नुकतेच तिचे काही मेजर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत आणि ते तुफान व्हायरल होत आहेत. 

‘मेजर थ्रोबॅक... माझ्या आयुष्यातील सैराट दिवस... बदलून गेलया सारंं...,’ असं कॅप्शन देत अमृताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील परकर पोलक्यातील अमृता खूपच निरागस आणि सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या अमृतानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. दिल्लीत एनएसडीत अमृता सत्यदेव दुबेंकडून ती अभिनयातील बारकावे शिकली.   रंगभूमीवर ‘ती फुलराणी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

2004 मध्ये ‘श्वास’ या सिनेमाद्वारे अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने अमृताही आज घराघरांत ओळखली जाते. अमृताची खासियत म्हणजे स्वत:लाच चॅलेंज ती नेहमी करते आणि ते ती यशस्वीपणे पूर्ण करते, मग ते कधी गाणं असो किंवा लिखाण.अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.  जाता जाता पावसाने हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस (2010), अजिंठा (2012) या सिनेमांसाठी अमृताने पार्श्वगायन केलं आहे. अमृताने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातसुद्धा काम केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात तिने रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली.अनेक वेबसीरिजमध्येही ती झळकली.

 

Web Title: marathi actress amruta subhash share her throwback photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.