घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:10 PM2021-05-18T16:10:46+5:302021-05-18T16:11:19+5:30

मानसी नाईकच्या या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mansi Naik's fan cleaning moment captured attention of fans who Responded with crazy comments | घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू

घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू

Next

''वाट बघतोय रिक्षावाला'' या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईक आता ''ले ले पंगापंगा'' म्हणत घरातला पंख्याची सफाई करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या डान्सने आणि अप्रतिम सौंदर्याने मानसी रसिकांची लाडकी अभिनेत्री आहे. मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. इथं ती स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते. विशेष म्हणजे लग्नानंतर मानसीकडे जरा जास्त चाहत्यांचे लक्ष तिच्यावर आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसी लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते.

 मानसी नाईकच्या या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही तिचे कौतुक करत आहेत तर काही मात्र तिची चेष्टा मस्करी करताना दिसत आहे. भन्नाट कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका युजरने तर मेकअप लावत पंख्याची साफ सफाई करत असल्याचे सांगत तिची खिल्ली उडवली आहे तर काहींना पंख्यावर इतकी धुळ बसेपर्यंत काय करत होतीस, तर काहींनी तिला पंखा पुसताना टीश्यु पेपरचा वापर करण्यावरुन सल्ला दिला आहे. तुर्तास मानसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक, कमेंट करताना आता दोन वेळा विचार करतील

सेलिब्रेटींच्या काही गोष्टी आवडत नसतीलह म्हणून युजर भान विसरत शिवीगाळही करताना दिसतात. अशा युजर्सचा बेशिस्तपणा आता सोशल मीडियावर सहन केला जाणार नाही म्हणत सेलिब्रेटी संताप व्यक्त करताना दिसतात. तुम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले ? त्याच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधावर पेठेत काम करणा-या महिला मोठ्या धाडसाने मेहनत करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छातीठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा असे मानसीने कमेंट करणा-याला तिच्याच भाषेत चांगलेच खडसावले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mansi Naik's fan cleaning moment captured attention of fans who Responded with crazy comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app