लग्नानंतरची मानसी नाईक आणि प्रदीप खरेराची रोमँटिक केमिस्ट्री 'वाटेवरी मोगरा' गाण्यात, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:07 PM2021-03-12T21:07:56+5:302021-03-12T21:08:35+5:30

मानसी आणि प्रदीप वाटेवरी मोगरा या रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये झळकले आहेत.

Mansi Naik and Pradip Kharera's romantic chemistry in the song 'Vatevari Mogra' after marriage, watch the video | लग्नानंतरची मानसी नाईक आणि प्रदीप खरेराची रोमँटिक केमिस्ट्री 'वाटेवरी मोगरा' गाण्यात, पहा व्हिडीओ

लग्नानंतरची मानसी नाईक आणि प्रदीप खरेराची रोमँटिक केमिस्ट्री 'वाटेवरी मोगरा' गाण्यात, पहा व्हिडीओ

googlenewsNext

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मानसी आणि प्रदीप वाटेवरी मोगरा या रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये झळकले आहेत.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचे पहिले गाणे वाटेवरी मोगरा नुकतेच रिलीज झाले आहे. वाटेवरी मोगरा या म्युझिक अल्बमची निर्मिती सागरीका म्युझिकने केली आहे. हे गाणे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरसाजात सजले आहे. निलेश मोहरीर यांनी "वाटेवरी मोगरा" या गाण्याची सुंदर रचना केली आहो. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.


वैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत १०० हुन अधिक गाणं गायिली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या १० मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात वाटेवरी मोगरामध्ये दिसणार आहे.

मानसी नाईक चा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी १९ जानेवारीला मानसीने प्रदीप खरेरा यांच्याशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित  दिसणार आहेत.


निलेश मोहरीर चे सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी वरच्या स्तरावरील गायन , सोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस  म्युझिक विडिओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक परफॉर्मन्स ही या म्युझिक व्हिडिओची खास वैशिष्ट्ये आहे.

Web Title: Mansi Naik and Pradip Kharera's romantic chemistry in the song 'Vatevari Mogra' after marriage, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.