मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, या चित्रपटात केलंय एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:00 AM2021-05-19T08:00:00+5:302021-05-19T08:00:00+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की, मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहे.

Makrand Anaspure's wife is also an actress | मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, या चित्रपटात केलंय एकत्र काम

मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, या चित्रपटात केलंय एकत्र काम

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. इतकेच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या चित्रपटात काम केले आहे. ‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील मकरंद यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहे. 


मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि सिनेमांमधून कामे केली आहेत. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पासोबत मकरंद यांची भेट झाली होती.

याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. येथेच मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याविषयी सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोन्ही घरुन काहीच विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. 


लग्नानंतरही शिल्पाने काही चित्रपटात पती मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटांत त्यांनी मकरंद यांच्यासोबत काम केले.  कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सिनेमात त्यांनी एकत्र काम केली आहेत. मकरंद आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील खारीचा वाटा आहे.


मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव केशव अनासपुरे असून तो नऊ वर्षाचा आहे. तर मुलगी चौदा वर्षांची आहे.

Web Title: Makrand Anaspure's wife is also an actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.