सध्या चित्रपट, मालिकांपेक्षा तरूणाईची जास्त पसंती वेबसीरिजला मिळताना दिसते आहे. त्यात हिंदीसोबतच मराठी वेबसीरिजदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' या शुद्धदेसी मराठीच्या पहिल्याच वेबसीरिजची सगळीकडे खूप चर्चा झाली आणि प्रशंसाही झाली. त्यानंतर आता शुद्धदेसी मराठीने तरूणाईला भावेल अशी आणखीन एक वेबसीरिज आणली आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड'. नुकताच या सीरिजचा पहिला एपिसोड रिलीज करण्यात आला असून त्याला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

 

कथा

'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' ही सीरिज सहा भागांची असून याची स्टोरी शार्दुलवर आधारीत आहे. शार्दुल हॅण्डसम पण डम्ब, फ्लर्टी असल्यामुळे त्याची एकही गर्लफ्रेंड नसते आणि तो गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी वेडापिसा होतो. एकेदिवशी गौरव व सायलीची पार्टी असते. या पार्टीत शार्दुल खूप ड्रिंक करतो. या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी त्याला बेडवर त्याच्यासोबत एक मुलगी झोपलेली दिसते. ही मुलगी कोण असेल असा विचार करीत असताना त्याला समजते की ही दुसरी तिसरी कुणी नाही गौरवची गर्लफ्रेंड सायली आहे. ती इथे कशी काय आली आणि त्या पार्टीत नेमके काय घडले, हे शोधण्याचा प्रयत्न शार्दुल करतो. या शोधात अनेक ट्विस्ट आणि नवीन गुपित उलगडताना पहायला मिळणार आहेत. 

पहिला एपिसोड

पहिल्या एपिसोडची सुरूवात होते ती शार्दुलच्या बोल्ड सीनने. त्याला जाग वळल्यावर त्याला वाटते की आपण तर स्वप्न पाहत होतो. पण त्याची बेडवर बाजूला नजर जाते तर त्याच्या बाजूला एक मुलगी झोपलेली असते. मग, ही कोण आहे, असा प्रश्न त्याला पडतो. मग तो काल रात्री काय घडले हे आठवू लागतो. सायली व गौरव त्यांच्या रिलेशनशीपला पाच वर्षे होतात म्हणून पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीत ते खूप ड्रींक करतात. या पार्टीत शार्दुल सोशल मीडियावरील एका चॅटिंग फ्रेंडला बोलवतो. पण ती ती नसून तो असल्याचे समजल्यावर त्याचा हिरमोड होतो. या पार्टीत तो बऱ्याच जणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याने इतके ड्रिंक केलेले असते की त्याला शेवटचे कोणासोबत बोललो हे देखील आठवत नसते. त्यात त्याचा हात बांधलेला असतो. तो हात सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला त्याच्या बाजूला झोपलेली दुसरी कुणी नसून गौरवची गर्लफ्रेंड सायली असते. आपल्या मित्राच्या पार्टीत तिच्याच गर्लफ्रेंडसोबत झोपलो होतो, हे समजल्यावर काय होईल. या भीतीने तो तिथून पळ काढतो. गपचुप पळण्याच्या नादात त्याचा बाटलीवर पाय पडतो आणि तोही पडतो. इथेच पहिला एपिसोड संपतो. 

आता पुढचा एपिसोड २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तरूणाईला रिलेट करणारी पात्र

माझ्या मित्राची गर्लफ्रेंड ही वेबसीरिज कॉलेज गोइंग व आजच्या तरूणाईला आपलीशी वाटणारी अशी आहे. फ्रेंडशीप, अफेयर आणि कॉलेज लाईफमध्ये अशा बऱ्याच रंजक गोष्टी घडत असतात. त्यामुळे या सीरिजमधील पात्र व घटना तरूणाईला रिलेट करतील. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या शीर्षकमधूनच नेमकी सीरिज कशावर असेल हे समजत असले तरी नेमके काय कथानक असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. तरूणाईंमध्ये सऱ्हास वापरली जाणारी भाषा यात आहे, त्यामुळे ते डायलॉग्ज ऐकणंही रंजक ठरणार आहे. यासोबतच बोल्ड सीनही आहेत. त्यामुळे ही सीरिज तरूणाईला भावेल, यात शंकाच नाही.

यंग कलाकारांचा कल्ला

माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसीरिजची कन्सेप्ट व कथा अलका शुक्ला यांची आहे. तर या सीरिजचे दिग्दर्शन देव खुबनानी व अंकुश मारोडे यांनी केले आहे. तर सीरिजमध्ये हिंदी व मराठी मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता अक्षय म्हात्रे मुख्य म्हणजे शार्दुलच्या भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत रुचिरा जाधव, प्रसाद शिखरे, ऐतष्ठा संसगिरी व प्राजक्ता परब अशा तरूण कलाकारांची फळी यात पहायला मिळेल. पहिल्या भागात तर या यंग कलाकारांच्या अभिनयाचा चोख कल्ला अनुभवायला मिळाला.


Web Title:  Majhya Mitrachi Girlfriend Epissode 1 Review: Friendship, Sex and Friendship Risk
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.