‘माझ्या बायकोचा प्रियकर’ गाणे सोशल मीडियावर ठरतंय सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:08 AM2018-10-22T10:08:41+5:302018-10-22T10:12:36+5:30

सिनेमात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात आहे.

Majhya Baikocha Priyakar Movie Song Superhit On Social Media | ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ गाणे सोशल मीडियावर ठरतंय सुपरहिट

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ गाणे सोशल मीडियावर ठरतंय सुपरहिट

googlenewsNext

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बॅनर खाली निर्मित मराठी सिनेमा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. नुकतेच झी म्युझिकने हे गाणे प्रदर्शित केले व ह्या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणे मीरा जोशी व मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. सिनेमाचे निर्माते दिपक रुईया, प्रदिप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत, त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे. कथा आणि दिग्दर्शन राजीव एस रुईया यांचे आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रस्तुतकर्ता व वितरक पेन इंडिया लिमिटेड आहे. सिनेमात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.

Web Title: Majhya Baikocha Priyakar Movie Song Superhit On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.