बॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांच्या मुलांचा डेब्यू सुरु आहे. मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्याची  मुलगी आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. आम्ही बोलतोय, महेश मांजरेकर यांच्याबददल. सलमान खानच्यादबंग 3’मधून अश्वमी मांजरेकर बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. अश्मीनंतर गौरीसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे मात्र, मराठी सिनेमातून. गौरीला मेहश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण'मधून लाँच करणार आहेत. 

टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,  ''गौरी पांघरुणमध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. आई-वडिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते की, त्यांचं मुलं त्याला जी गोष्ट आवडतं त्यात करिअर करतोय.

गौरीने बालकलाकार म्हणून मराठी सिनेमात काम केले आहे. 'पांघरुण'मधून ती मुख्य अभिनेत्री म्हणून डेब्यू करतेय. हा एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे. सिनेमाची कथा एक विधावा महिल्याच्या आयुष्याभवती फिरणारी आहे.'' 


महेश मांजरेकर २००८ मध्ये आलेल्या दे धक्का सिनेमाचा पुढचा पार्ट घेऊन येत आहेत. दे धक्का चित्रपटामधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही 'दे धक्का २' मध्ये दिसेल.

महेश मांजरेकरदेखील यात भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मेहश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. मराठीतील ‘दे धक्का’ हा सिनेमा एका हॉलिवूडपटावर आधारित होता. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘लिटील मिस सनशाईन’ या २00६ मध्ये ‘रिलीज झालेल्या सिनेमाची कथा आणि २00८ मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘दे धक्का’ या सिनेमाची कथा सारखीच होती. 


Web Title: Mahesh manjrekar to introduce his daughter gauri ingawale as lead actress with marathi film panghrun
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.