महेश लिमयेने मित्र देवेंद्र गायकवाडला वाढदिवसाचे दिले अनोखे दबंग गिफ्ट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 04:35 PM2019-08-29T16:35:18+5:302019-08-29T16:39:50+5:30

देवेंद्रने छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

Mahesh Limaye Gives Unique Birthday Gift to friend Devendra Gaikwad, read details | महेश लिमयेने मित्र देवेंद्र गायकवाडला वाढदिवसाचे दिले अनोखे दबंग गिफ्ट, वाचा सविस्तर

महेश लिमयेने मित्र देवेंद्र गायकवाडला वाढदिवसाचे दिले अनोखे दबंग गिफ्ट, वाचा सविस्तर

googlenewsNext

मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे,  केक,  फुले,  भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क सुपरस्टार सोबत सिनेमात एक भूमिकाच गिफ्ट दिली तर? हो, असेच एक सरप्राईज दबंग गिफ्ट प्रसिद्ध कॅमेरामन महेश लिमयेने आपला मित्र अभिनेता देवेंद्र गायकवाड याला दिले आहे.

महेश लिमये सुपरस्टार सलमान खानच्या ‘दबंग ३’चे कॅमेरामन आहेत. दिनांक २६ ऑगस्ट रोजी देवेंद्र गायकवाडचा वाढदिवस होता. महेश लिमयेने पुण्याजवळील फलटण येथून 'दबंग ३'च्या शूटींग सेटवरून देवेंद्र गायकवाड याला फोन करून फलटणला बोलावून घेतले आणि त्याला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट म्हणून चक्क 'दबंग ३' मध्ये एक छोटी भूमिका दिली.

देवेंद्रने छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र गायकवाडने यापूर्वी ‘मुळशी पॅटर्न’, ‘बबन’, ‘देऊळ बंद’, ‘एक हजाराची नोट’, ‘किल्ला’, ‘रेगे’, ‘मंगलाष्टक - वन्स मोर’  'सलाम' इ. चित्रपटांमध्ये तसेच तुझं माझं जमेना, बेधुंद मनाच्या लहरी, पिंपळपान अशा अनेक मालिका आणि अनेक प्रायोगिक आणि 'माकडाच्या हाती शॅम्पेन' सारख्या व्यावसायिक नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. २००४ साली देवेंद्रच्या ‘देता का करंडक’ या एकांकिकेला  पुरुषोत्तम करंडक मिळाला होता.
 

Web Title: Mahesh Limaye Gives Unique Birthday Gift to friend Devendra Gaikwad, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.