रुपाली चाकणकरांच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'या' मराठी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:55 PM2022-04-11T12:55:54+5:302022-04-11T12:56:40+5:30

Rupali chakankar: आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश घेतला आहे. तर, असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या कुटुंबाचा संबंध थेट राजकारणाशी येतो.

maharashtra state commission for women chairperson rupali chakankars son soham chakankar to debut in marathi films | रुपाली चाकणकरांच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'या' मराठी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

रुपाली चाकणकरांच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'या' मराठी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

googlenewsNext

कलाविश्व आणि राजकारण यांचा गेल्या कित्येक काळापासून जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश घेतला आहे. तर, असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या कुटुंबाचा संबंध थेट राजकारणाशी येतो. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. कलाविश्वात सक्रीय असलेल्या रितेशचे वडील राजकारणात सक्रीय होते. तसंच त्यांचे भाऊदेखील या क्षेत्रात नशीब आजमात आहेत. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्याच पावलावर पाऊल ठेवत आता आणखी एका राजकीय व्यक्तीच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर (soham chakankar) लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'तू आणि मी, मी आणि तू'  या चित्रपटात सोहम महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून त्याच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या लेकाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेण्यात आले आहे. 

"अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला आमच्या चित्रपटाचे निर्माते सागर जैन यांनी दिली, आणि दिग्दर्शक कपिल सरांनी मला दिलेलं प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला आमच्या टीमने खूप सपोर्ट केलं मुळे मला एकदाही मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव भासली नाही. मला कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरेच काही नव्याने शिकता आले. आणि, माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला, 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे, " असं सोहम म्हणाला.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन कपिल जोंधळे करत आहेत. तर, चित्रपटाच्या निर्मितीच धुरा  राजू तोड़साम, ऋषभ कोठारी व सागर जैन  यांच्या खांद्यावर आहे. जैन फिल्म प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट तयार केला जाणार आहे.

Web Title: maharashtra state commission for women chairperson rupali chakankars son soham chakankar to debut in marathi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.