नववधू प्रमाणे सजली ही मराठी अभिनेत्री, फिटनेसच्या बाबतीत देते मलायकाला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:00 AM2020-03-08T07:00:00+5:302020-03-08T07:00:00+5:30

एका मुलाची आई आहे ही अभिनेत्री.

Madhavi nimkar share her bridal photoshoot on instagram gda | नववधू प्रमाणे सजली ही मराठी अभिनेत्री, फिटनेसच्या बाबतीत देते मलायकाला टक्कर

नववधू प्रमाणे सजली ही मराठी अभिनेत्री, फिटनेसच्या बाबतीत देते मलायकाला टक्कर

googlenewsNext

सोशल मीडियावर अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. माधवी निमकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो. ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला रसिकांची पंसती मिळते. इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते.


माधवी पाच वर्षाच्या मुलाची आई आहे.  रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे. घर आणि करिअर करताना माधवीचीसुद्धा तारेवरची कसरत सुरु असते. पण एवढ्या बिझी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते. तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती अजिबात दुर्लक्ष करत नाही हे तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हि़डीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र माधवीने ब्राईडल लूकमधील फोटो शेअर करुन सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. माधवी यात फोटोंमध्ये नववाधूप्रमाणे दिसतेय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. 


'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिका आणि 'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करुन भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत.

Web Title: Madhavi nimkar share her bridal photoshoot on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.