लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण!

By तेजल गावडे | Published: September 24, 2020 02:50 PM2020-09-24T14:50:09+5:302020-09-24T14:50:52+5:30

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

Laxmikant Berde's daughter shared a photo of her childhood, saying - I want my childhood back! | लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण!

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण!

googlenewsNext


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर करत माझं बालपण परत द्या असं म्हटलंय. या फोटोत स्वानंदी खूपच क्यूट दिसते आहे. 

स्वानंदीने बालपणीचा फोटो शेअर करत म्हटले की,जेव्हा गोष्टी सामान्य होतील तेव्हा आपण परत जाऊ शकतो. आमच्या जवळचे लोक होते. प्रेम पूर्णपणे निस्वार्थ होते. फक्त वाईट बाब ही आहे की आपल्याला हवे असलेले चॉकलेट मिळणार नाही. सर्व निरागसपणा परत हवा आहे. एका व्यक्तीला मी खूप मिस करते. त्यावेळचे रडणे, हसणे आणि फुगून बसणे या सर्व भावना खूप वेडसर वाटतात. फक्त माझे बालपण परत पाहिजे!

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे.

यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे. स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

Web Title: Laxmikant Berde's daughter shared a photo of her childhood, saying - I want my childhood back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.