Laxmikant Barde and his son are similar in this thing, said Priya Berde | लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनयमध्ये आहे हे साम्य, खुद्द सांगितले प्रिया बेर्डे यांनी
लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनयमध्ये आहे हे साम्य, खुद्द सांगितले प्रिया बेर्डे यांनी


रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे व त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. यावेळी प्रिया बेर्डे यांच्याशी बोलताना त्यांनी बऱ्याचदा अभिनयमध्ये लक्ष्माकांत बेर्डे यांचा भास होत असल्याचे सांगितले.

प्रिया बेर्डे यांनी सांगितले की, अभिनयसोबत काम करताना मला लक्ष्मीकांतचा भास व्हायचा. त्याचे डोळे, केस व हावभाव पाहून काही क्षणाला मला लक्ष्मीकांतची जाणीव व्हायची. लक्ष्मीकांतसोबत मी खूप चित्रपटात काम केले होते. त्यामुळे मला अभिनयला काम करताना पाहताना बऱ्याचदा मला लक्ष्मीकांतचे भास होतात. उभी राहण्याची स्टाईल व कपड्यांचा सेन्स या गोष्टी अभिनयच्या लक्ष्मीकांत सारख्या आहेत. 


आज लक्ष्मीकांत असते तर त्यांना देखील मुलांना चित्रपटसृष्टीत काम करताना पाहून आनंद झाला असता. त्यांनीदेखील अभिनयसोबत काम केले असते. ते असते तर मुलांचे थोडे वेगळे कौतूक झाले असते. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत सदैव आहेत. आज पंधरा वर्षे झालीत लक्ष्मीकांत यांना जाऊन पण आजही लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कायम असल्याचे प्रिया यांनी सांगितले.


रंपाट चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया बेर्डे व अभिनय एकत्र काम करत आहेत, या अनुभवाबद्दल सांगितले की, मला आनंद होतो आहे की, मी अभिनयसोबत दुसऱ्यांदा चित्रपटात काम केले. सेटवर आमच्या दोघांचाही अ‍ॅटिट्युड प्रोफेशनल होता. मी त्याच्या कुठल्याही कामात दखल घेत नाही किंवा सेटवर जात नाही. पण, यावेळेस आम्ही एकाच सेटवर होतो. एखाद दुसऱ्या सल्ल्याशिवाय मी त्याच्या कामात अजिबात ढवळाढवळ केली नाही. यश व अपयश दोन्हीला सामोरे जात त्याने अनुभवाने समृद्ध व्हावे, असे मला वाटते. 


Web Title: Laxmikant Barde and his son are similar in this thing, said Priya Berde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.