'लक्ष्मी' सिनेमाचा खरा हीरो ठरतोय 'हा' मराठी अभिनेता,सिनेमात छोटीशी भूमिका असली तरी आहे लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 03:40 PM2020-11-10T15:40:47+5:302020-11-10T15:42:06+5:30

राघव लॉरेन्सने सिनेमाचे दिग्दर्शन केले असल्याने अक्षयच्या या सिनेमावर साऊथचा प्रभाव दिसतो. ‘कंचना’ प्रदर्शित होऊन 10 वर्षे झालीत. इ

Laxmii public response people loved sharad kelkar performance over akshay kumar | 'लक्ष्मी' सिनेमाचा खरा हीरो ठरतोय 'हा' मराठी अभिनेता,सिनेमात छोटीशी भूमिका असली तरी आहे लक्षवेधी

'लक्ष्मी' सिनेमाचा खरा हीरो ठरतोय 'हा' मराठी अभिनेता,सिनेमात छोटीशी भूमिका असली तरी आहे लक्षवेधी

googlenewsNext

अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी' सोमवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तामिळ हॉरर कॉमेडी चित्रपट कांचनाचा रिमेक असलेला लक्ष्मी हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सुरूवातीपासून अक्षय कुमारमुळेच सिनेमा जास्त चर्चेत राहिला.

प्रमोशन दरम्यान कुठेही इतर कलाकारांची नावे समोर आली नव्हती. अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. मात्र तरीही  ट्रेलरमध्ये कुठेही शरद केळकर दिसला नाही. मात्र चित्रपटातील त्याची एंट्री पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. शरद केळकरच्या भूमिकेचा प्रमोशनवेळी कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता.

 

शरद केळकरने चित्रपटात पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला आहे.  त्याच्यामुळेच काही काळ रसिक खिळून राहतात. शरद केळकरने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारपेक्षा शरदच्याच भूमिकेचे  जास्त कौतुक होत आहे.

चित्रपटात शरदच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली असली तरीही  त्याने ती चांगली साकारली आहे. एका युजनेतर ट्विटमध्ये 'तान्हाजी' चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील शरद आणि 'लक्ष्मी' चित्रपटातील लूकचा कोलाज बनवत शेअर केला आहे. अक्षय कुमार चित्रपटाचे हृदय असला तर  शरद केळकरच त्याचा आत्मा असल्याचे बोलले जात आहे. 

Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

राघव लॉरेन्सने सिनेमाचे दिग्दर्शन केले असल्याने अक्षयच्या या सिनेमावर साऊथचा प्रभाव दिसतो. ‘कंचना’ प्रदर्शित होऊन 10 वर्षे झालीत. इतक्या वर्षांनंतर हिंदीत याचा रिमेक तयार होत असेल तर काळानुरूप आणि बॉलिवूड प्रेक्षकानुरूप सुसंगत बदल अपेक्षित होते. राघव लॉरेन्सने मात्र अपेक्षित बदल न करताच जशाच्या तसा रिमेक बनवून प्रेक्षकांच्या माथी मारला आहे. साऊथच्या सिनेमातील व्याकरण थेट हिंदीत वापरलेले पाहून डोक्याचा पार भुगा होतो. साऊथचे सिनेमे आवडत असतील तर ठीक. मात्र आवडत नसतील तर चित्रपटाच्या सुरूवातीला पहिलेच गाणे खटकते आणि यानंतर चित्रपटातील इंटरेस्ट संपतो. या चित्रपटातील प्रत्येक गाणी कथेला सुरूंग लावण्याचे काम करतो. बुर्ज खलीफा हे गाणे हिट आहे. मात्र सिनेमात ते खटकते.

Web Title: Laxmii public response people loved sharad kelkar performance over akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.