लेक चालली सासरला; आईच्या डोळ्यांत आल्या अश्रुधारा, पहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 02:39 PM2017-11-08T14:39:50+5:302017-11-08T20:09:50+5:30

मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या लग्नाची धामधूम सुरू असून, लग्नविधीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यातील काही फोटो आम्ही ...

LAKE walking on the road; Mother's eyes are tears, see prayer photo of wedding! | लेक चालली सासरला; आईच्या डोळ्यांत आल्या अश्रुधारा, पहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे फोटो!

लेक चालली सासरला; आईच्या डोळ्यांत आल्या अश्रुधारा, पहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे फोटो!

googlenewsNext
ाठीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या लग्नाची धामधूम सुरू असून, लग्नविधीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यातील काही फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार असून, त्यामध्ये प्रार्थनाचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. काल प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुंडावळ्या बांधलेला एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पोस्ट होताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तिचा हा फोटो प्रचंड पसंत केला गेला. आता प्रार्थनाने पुन्हा काही कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले असून, त्यामध्ये तिचा संपूर्ण परिवार खूपच आनंदी दिसत आहे. शिवाय लेक सासरला जात असल्याने आईच्या डोळ्यात अश्रुधारा आल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे. 



होय, एका फोटोमध्ये प्रार्थना तिच्या आईला मिठी मारताना दिसत असून, आईचे डोळे पाणावलेले आहेत. लेक सासरला जात असल्याचा विरह अन् आनंद त्यांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत आहे. तसेच इतर फोटोंमध्ये प्रार्थना तिच्या बहीण-भावंडं आणि वडिलांसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रार्थनाने एक कॅप्शन लिहिली असून, त्यामध्ये मी तुम्हा सर्वांना खूप मिस करणार, असे म्हटले आहे. 



प्रार्थनाचे अभिषेक जावकरसोबत लग्न होणार असून, अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्टिब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. ‘डब्बा ऐसपैस, सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मितीदेखील केली आहे. प्रार्थना आणि अभिषेकचे हे अ‍ॅरेंज मॅरेज असून, एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली होती. ते दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ते कुठे लग्न करणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. 





प्रार्थना बेहरेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरु वात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत तिने रसिकांची मने जिंकली. यानंतर  मतिवा, कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमांतून तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली. 

Web Title: LAKE walking on the road; Mother's eyes are tears, see prayer photo of wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.