लग्नाच्या फोटोमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री ओळखा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:15 AM2019-06-21T07:15:00+5:302019-06-21T07:15:00+5:30

आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय.

Know this Actress in wedding photo, pic viral on social media | लग्नाच्या फोटोमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री ओळखा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

लग्नाच्या फोटोमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री ओळखा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

googlenewsNext

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय. मृणाल कुलकर्णी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो मृणाल यांच्या लग्नाचा आहे. या फोटोत मृणाल यांना ओळखताही येत नाही. या फोटोला रसिकांकडून बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळतायत. १० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत. 


बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी सांगितलंय. लेक विराजस पोटात असताना  त्यांनी ‘श्रीकांत’ नावाची मालिका केली होती. या मालिकेत त्यांनी बंगाली स्त्रीची भूमिका साकारली होती. साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असेपर्यंत ही भूमिका साकारू शकल्याचे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं. बाळंतपणाच्या निमित्ताने थोडी विश्रांती घेतली आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे पुन्हा जोमाने कामाला लागल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


लग्न झालंय आणि मूल आहे हे लपवण्याची कधीच गरज वाटली नसल्याचंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. आपल्या नॉनस्टॉप काम करण्याचं श्रेय मृणाल यांनी कायम आपल्या सासूबाई आणि पतीला दिलं आहे.

 

मृणाल कुलकर्णी महानायकाकडून शिकल्या ही गोष्ट…

मृणाल कुलकर्णी ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून एक गोष्ट शिकल्या आहेत. स्वतः त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.बिग बी यांच्याप्रमाणेच शुटिंग आणि कार्यक्रमस्थळी त्या वेळेआधी पोहचतात. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मृणाल कुलकर्णी गेल्या होत्या. त्या कार्यक्रमाला बिग बी प्रमुख पाहुणे होते.शुटिंग आटोपून मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमासाठी संध्या. ५.४५वा. पोहचल्या. त्यावेळी बिग बी तिथे आधीच पोहोचले होते. उपस्थितांशी ते गप्पा मारत होते. त्यांना पाहून मृणाल कुलकर्णी आश्चर्यचकित झाल्या. कारण आयोजकांनी बिग बींना संध्या.६वा.ची वेळ दिली होती. मात्र बिग बी वेळेच्या अर्धा तासआधीच म्हणजे ५.३०वा. कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. इतका मोठा कलाकार वेळ पाळत असल्याचे पाहून मृणाल कुलकर्णी थक्क झाल्या आणि हीच गोष्ट त्या स्वतःही नियमित पाळतात. 

Web Title: Know this Actress in wedding photo, pic viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.