केतकी माटेगावकरचा आनंद म्हणून गगनात मावेना, सोशल मीडियावर शेअर केल्या भावना….

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:43 AM2019-09-17T11:43:08+5:302019-09-17T11:45:59+5:30

तिने निळाई गाण्याच्या लॉन्चचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ketaki Mategaonkar so happy for this reason, shared her feelings on social media | केतकी माटेगावकरचा आनंद म्हणून गगनात मावेना, सोशल मीडियावर शेअर केल्या भावना….

केतकी माटेगावकरचा आनंद म्हणून गगनात मावेना, सोशल मीडियावर शेअर केल्या भावना….

googlenewsNext

जेव्हा आपल्या कामाचं कौतुक होतं आणि तेही एका सुपरस्टारकडून तेव्हा कुणाचीही अवस्था आज मैं उपर आसमाँ नीचे अशीच होईल. अगदी काहीसं असंच घडलंय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या आयुष्यात. केतकीच्या सूरांनी सजलेल्या ''निळाई'' या आगामी पांघरुण चित्रपटातील गाणं दबंग सलमान खान याने लॉन्च केलं. 


'बिग बॉस मराठी सीझन २' च्या एका भागात सलमानने विशेष उपस्थिती लावली होती. बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत केतकीच्या सुरांनी सजलंय. 'निळाई' गाणं हे लॉन्च केल्यानंतर सलमानला ते भावलं. त्याने यावेळी गायिका केतकी माटेगावकर हिचं तोंडभरून कौतुक केलं. खुद्द बॉलीवूडचा दबंग आणि सुपरस्टार सलमानने केलेली स्तुती ऐकून केतकी भारावून गेली आहे. तिने आपला हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. 


तिने निळाई गाण्याच्या लॉन्चचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “निळाई या गाण्याचं सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत लॉन्चिंग झालं. या चित्रपटाचा गायिका म्हणून मी एक भाग आहे यासाठी स्वतःला नशीबवान समजते. जेव्हा सलमान खाननं हे गाणं लॉन्च केलं त्यावेळी मनात आलेल्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

मी खूप नशीबवान आणि माझा मोठा सन्मान झाल्याच्या भावना मनात दाटून आल्या. ही आठवण आयुष्यभर जपून ठेवावी अशीच आहे. धन्यवाद महेश मांजरेकर, सलमान खान, निखील साने आणि सुंदर संगीतासाठी हितेश मोडक मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे” अशा भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 

Web Title: Ketaki Mategaonkar so happy for this reason, shared her feelings on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.