तुम्ही हिला ओळखलंत का ? ७ वर्षांत इतकी बदललीय 'टाईमपास'मधील प्राजू, फोटो पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:00 AM2021-02-24T07:00:00+5:302021-02-24T07:00:02+5:30

या फोटोशूटमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

Ketaki mategaonkar look more beautiful | तुम्ही हिला ओळखलंत का ? ७ वर्षांत इतकी बदललीय 'टाईमपास'मधील प्राजू, फोटो पाहून व्हाल थक्क!

तुम्ही हिला ओळखलंत का ? ७ वर्षांत इतकी बदललीय 'टाईमपास'मधील प्राजू, फोटो पाहून व्हाल थक्क!

googlenewsNext

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे. केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यातील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहे. केतकीच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.


केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. टाईमपास'मधील प्राजूच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात देखील केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

Web Title: Ketaki mategaonkar look more beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.