'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना दिसणार या वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:20 PM2021-02-27T15:20:03+5:302021-02-27T15:20:39+5:30

'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना लवकरच वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Kahe Dia Pardes' fame sage Saxena will appear in this webseries | 'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना दिसणार या वेबसीरिजमध्ये

'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना दिसणार या वेबसीरिजमध्ये

googlenewsNext

'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना लवकरच वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुडबॉय असे या सीरिजचे नाव आहे. मुलींच्या मागे असलेल्या आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट गुडबॉय या मराठी वेब सीरिजमधून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली असून हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहायला मिळणार आहे. 

गुडबॉय या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना,  खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं  वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्यं आहेत. 

गुडबॉय ही वेबसिरीज 'हंगामा'च्या हंगामा प्ले’ या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसंच एमएक्स प्लेयर, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही, टाटा स्काय बिंज, डिशस्मार्ट स्टीक, डी2एच स्ट्रीम, डिशस्मार्ट हब, शिवाय मेघबेला ब्रॉडबॅंड, अलियान्स ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट आणि नेटप्लस यांच्यासारखे आयएसपी तसेच टीसीएल, वनप्लस टीव्ही, सोनी ब्राविया, सीव्हीटीई, तोशिबा आणि क्लाऊडवॉकर अशा स्मार्ट टीव्हींवर हंगामा प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमी समवेतच्या भागीदारीने ग्राहक हंगामा प्लेद्वारे 'मी टीव्ही’वर ही सीरिज पाहू शकतील.
 

Web Title: 'Kahe Dia Pardes' fame sage Saxena will appear in this webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.