जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस व बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:15 AM2019-10-28T07:15:00+5:302019-10-28T07:15:00+5:30

जयवंत वाडकर यांच्या मुलीने 'एफ यू'मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Jaywant Wadkar's daughter is very glamorous and bold, see her photos | जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस व बोल्ड, पहा तिचे फोटो

जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस व बोल्ड, पहा तिचे फोटो

googlenewsNext


अभिनेते जयवंत वाडकर यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. जयवंत वाडकर यांनी १९८८ साली 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी १९८८ साली एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून ते मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. आतापर्यंत त्यांचे मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपट रिलीज झाले आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे.

जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मय वाडकर हे त्यांच्या मुलाचे नाव असून स्वामिनी हे मुलीचे नाव आहे.


दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे जयवंत वाडकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी आणि जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी यांचे बारसे एकत्र करण्यात आले होते. 


जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले आहे. आता लवकरच ती सचिन पिळगावकर यांच्या 'ये है आशिकी' या चित्रपटात झळकली आहे.

जयवंत वाडकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकीदेखील एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत.

दोघींच्याही सोशल मीडिया अकाउंटवर त्यांची एकमेकींसोबतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. 


स्वामिनी सोशल मीडियावर सक्रीय असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

Web Title: Jaywant Wadkar's daughter is very glamorous and bold, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.