कलाकार मंडळींच्या खासगी जीवनाविषयी रसिकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात. आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात.सोशल मीडियाव रोज काही ना काही गोष्टी ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळते. तसाच एक ट्रेंड काही दिवसांपासून फेसअॅपच्या माध्यमातून म्हातारपणाच्या लूकचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना या फेसअॅपने वेड लावलंय. कलाकार मंडळीही या फेसअॅपच्या प्रेमात पडले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनाही या फेसअॅपने वेड लावले आहे. 


म्हातारपणी कसे दिसणार याचे फोटो ही सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटो शेअर करण्याच्या ट्रेंडमध्ये आता मराठी कलाकारही सहभागी होऊ लागले आहेत. नुकतेच इशा केसकरनेही तिचा म्हातारपणातील लूक शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही इशाच आहे का असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 

'जय मल्हार' मालिकेतील 'बानू' या  भूमिकेमुळे इशा घराघरात पोहचली. सध्या इशा छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत काम करतेय. ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री इशा केसकरचा अभिनय रसिकांना भावतोय. रसिका सुनीलची एक्झिट झाल्यानंतर इशानं त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.


 ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनासह रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा आहेत. गेल्या दोन वर्षापासून दोघांचे अफेअर असल्याचे बोलले जाते. तसेच खुद्द इशानेच सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ऋषी सक्सेनासह फोटो शेअर करत तिने म्हटले होते की,रिलेशनशिपला २ वर्षे पूर्ण होत असले तरी लग्नाचा सध्या तरी विचार नसल्याचेही ईशाने स्पष्ट केले होते.
 


Web Title: Isha Keskar Shared pic using Faceapp, SEE PIC
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.