Coronavirus:कोरोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्या रंगमंच कामगारांना मिळाला दिलासा

By अजय परचुरे | Published: March 16, 2020 05:03 PM2020-03-16T17:03:34+5:302020-03-16T18:07:57+5:30

कोरोनाच्या फटक्याने नाट्यगृहं बंद असल्याने रंगमंच कामगार हवालदिल झाला होता. त्याला आता या मदतीने आशेचा किरण मिळाला आहे.

https://www.lokmat.com/marathi-cinema/backstage artist get releif after corona/ASP | Coronavirus:कोरोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्या रंगमंच कामगारांना मिळाला दिलासा

Coronavirus:कोरोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्या रंगमंच कामगारांना मिळाला दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देरंगमंच कामगार संघटनेने प्रत्येक रंगमंच कलाकाराला प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत केली आहे.

कोराेनाचं भयाण वास्तव दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने तात्काळ चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारने खबरदारी म्हणून घेतलेला हा निर्णय नाटकांच्या प्रयोगावर अवलंबून असलेल्या रंगमंच कामगारांना मात्र चांगलाच फटका देऊन गेला. . नाटकांचे प्रयोगच ठप्प झाल्याने या नाटकांच्या प्रयोगावर पोट असणाऱ्या किमान 700 कामगारांना नाटक बंद राहिपर्यंत हलाखीचे दिवस जगावे लागत होते. मात्र या रंगमंच कलाकारांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघटना एक पालक म्हणून भक्कमपणे उभी राहिली आहे. सोमवारी रंगमंच कामगार संघटनेने प्रत्येक रंगमंच कलाकाराला प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत केली आहे. ह्यामुळे कोरोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्य़ा रंगमंच कामगारांना यामुळे थोडा का होईना सुखद दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने खबरदारी म्हणून शहरातील मॉल्स , चित्रपटगृह आणि नाट्यगृह अनिश्चित काळापर्यंत बंद केली आहेत . मुळात नाट्य व्यवसाय सध्या सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार - रविवार या दोन दिवशी तेजीत असतो . शनिवार आणि रविवार मुंबई , पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असतात . . मात्र सरकारच्या  तातडीच्या निर्णयामुळे सर्व नाट्यगृहातील सर्व नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत . मात्र यामुळे या सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय . नाटकाचा प्रयोग झाल्यावर मिळणारी नाईट ही या कामगारांची हक्काची आणि मेहनातीची कमाई . मात्र अनिश्चित काळापर्यंत नाट्य प्रयोग बंद झाल्याने या सर्व रंगमंच कामगारांवर प्रयोग नाही तर नाईट नाही अशी वाईट वेळ या कामगारांवर आली होती. ह्यावर तोडगा म्हणून आणि रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून रंगमंच कामगार संघटनेने हवालदील झालेल्या या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये तात्पुरती मदत करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्याचीच पूर्तता म्हणून सोमवारपासून या रंगमंच कामगारांना मुंबईतील यशंवत नाट्यमंदिरातील रंगमंच कामगार संघटनेच्या कार्यालयात ही मदत करण्यात आली. या तात्पुरत्या मदतीमुळे रंगमंच कामगार संघटनेचे जवळपास 8 लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र हलाखीच्या परिस्थित मिळालेल्या या मदतीमुळे रंगमंच कलाकारांच्या चेहऱ्यावर थोडे तरी हास्य फुलले आहे. यावेळी रंगमंच कामगार संघटनचे विद्यमान अध्यक्ष किशोर वेल्हे, माजी अध्यक्ष रत्नकांत जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: https://www.lokmat.com/marathi-cinema/backstage artist get releif after corona/ASP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक