साडीत खुललं या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडला प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:15 AM2020-01-22T07:15:00+5:302020-01-22T07:15:00+5:30

मालिका आणि नाटक विश्वात तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Hruta durgule share her saree photoshoot on instagram | साडीत खुललं या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडला प्रेमात

साडीत खुललं या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडला प्रेमात

googlenewsNext

मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे. ह्रता दुर्गुळे  सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ह्रताने साडीत फोटोशूट शेअर करत सगळ्यांना क्लीन बोल्ड केले.यात ह्रता खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


 छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे टीजर पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टवर  अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे.

त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या सिनेमातून मांडलं जाणार असल्यानं हा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही. लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.

अनन्या नाटकात ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती. नाटकातील तिच्या भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली होती. मात्र सिनेमासाठी अनन्याचं पात्र कोण साकारणार याबद्दल विशेष उत्सुकता होती. तर त्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले होते.

Web Title: Hruta durgule share her saree photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.