नवनव्या संकल्पना असणाऱ्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी 'झी युवा', प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहे. उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा 'झी युवा'च्या माध्यमातून पाहायला मिळतात.

तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे 'झी युवा सन्मान' हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या पुरस्कार सोहळ्यात, 'झी युवा' वाहिनीवरील 'फुलपाखरू' या मालिकेतील गुणी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला 'युवा तेजस्वी चेहरा' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या विश्वात सुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे. मालिका आणि नाटक विश्वातील तिच्या अभिनयाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत असते. या अभिनेत्रीचा सन्मान 'झी युवा सन्मान' सोहळ्यात करण्यात आला.

या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कार देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. 


Web Title: Hruta durgule got 'Yuva Tejasvi Chehra'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.