महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी नव्या वर्षाची सुरूवात कशी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 04:35 PM2017-01-01T16:35:21+5:302017-01-01T16:35:21+5:30

आपल्या सुरेख आवाजाने गायर महेश काळे आणि राहूल देशपांडे यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांच्या या दोन लाडक्या गायकांनी ...

How Mahesh Kale and Rahul Deshpande started the new year? | महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी नव्या वर्षाची सुरूवात कशी केली

महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी नव्या वर्षाची सुरूवात कशी केली

googlenewsNext
ल्या सुरेख आवाजाने गायर महेश काळे आणि राहूल देशपांडे यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांच्या या दोन लाडक्या गायकांनी आपली नवीन वर्षाची सुरूवात अभिजात परांपरांच्या सुर-साथीच्या मैफीलीने केली आहे. त्यांची ही मैफिल पुणे येथे भरविण्यात आली होती. गायक राहूल देशपांडे आणि महेश काळे यांच्या स्वरसाजाने सजलेली भजन आणि नाट्यसंगीताच्या या मैफिलीचा आनंद सुमारे ४ हजार रसिक प्रेक्षकांनी घेतला. या मैफिलीला गुंफताना राहूल देशपांडे व महेश काळे यांनी अहिर भैरवी पासून सुरूवात केली. अलबेला सजन घर आयो या गाण्याने त्यांनी कार्यक्रमाची मध्यान केली. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकातील दोन घराण्यातील फरक समजावून देताना त्यातील गाण्यांची दुहेरी पध्दतीने सादरीकरण रसिकांसमोर केले. राजा पंढरीचा भजनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या भजनातील विठ्ठल विठ्ठल या गाण्याने प्रेक्षकांचे मनच जिंकले. नववर्ष पहाट संकल्पनेबद्दल बोलताना राहूल म्हणाला की, दिवाळी, पाडवा किंवा दसºयाची सुरमयी पहाट आपण नेहमीच अनुभवतो. १ जानेवारीची पहाट आत्तापर्यंत आपण अनुभवलेली नव्हती. पण नववर्ष पहाट मैफिलीव्दारे एक नवा प्रयोग रसिक श्रोते पुणेकरांसमोर सादर करण्यात आला व त्यास प्रेक्षकांनी गतवषीर्पेक्षा जास्त रिस्पॉन्स दिला. या मैफिलीला निखील पाठक यांनी तबला, राहूल गोळे यांनी हार्मोनियम, ऋषीकेश पाटील आणि राजस जोशी यांनी तानपुरा, माऊली टाकळकर यांनी टाळ अशी साथसंगत केली.या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरूवात झक्कास झाली म्हणण्यास हरकत नाही. 










Web Title: How Mahesh Kale and Rahul Deshpande started the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.