Hotness Alert! नेहा पेंडसेचे थ्रोबॅक हॉट फोटो पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:00 AM2020-04-29T07:00:00+5:302020-04-29T07:00:00+5:30

नेहा पेंडसेच्या जुन्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

Hotness Alert! You will see Neha Pendse's throwback hot photo TJL | Hotness Alert! नेहा पेंडसेचे थ्रोबॅक हॉट फोटो पाहून व्हाल खल्लास

Hotness Alert! नेहा पेंडसेचे थ्रोबॅक हॉट फोटो पाहून व्हाल खल्लास

googlenewsNext

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. लॉकडाउनमुळे नेहा सध्या घरात कैद आहे. नुकतेच तिने तेजस नेरूरकरने केलेल्या फोटोशूटमधील जुने फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड दिसते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. लग्नानंतर नेहा तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करते.

लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याचे नेहा सांगते. आता मला माझे घर आहे. पण नवऱ्यासोबत माझे घर ही गोष्ट खूप वेगळी आहे. नवऱ्यासोबत असता तेव्हा तुम्ही जबाबदार बनता आणि मी जबाबदार झाले आहे.

नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.हा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. तिचा असाच एक दुसरा फोटोही समोर आला आहे.


नेहा जून चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Hotness Alert! You will see Neha Pendse's throwback hot photo TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.