महासत्ता नाही, ‘महाथट्टा’ नक्कीच झालीय...! मुंबईतील ‘हे’ दृश्य पाहून संतापला अभिनेता हेमंत ढोमे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 04:01 PM2021-04-25T16:01:29+5:302021-04-25T16:16:09+5:30

लसीकरण केंद्रावरची गर्दी आणि यामुळे सामान्यांना सोसावा लागत असलेला त्रास यावर भाष्य करणारी जळजळीत पोस्ट हेमंत ढोमेने शेअर केली आहे...

hemant dhome tweeted ON inconvenience at vaccination center in mumbai | महासत्ता नाही, ‘महाथट्टा’ नक्कीच झालीय...! मुंबईतील ‘हे’ दृश्य पाहून संतापला अभिनेता हेमंत ढोमे

महासत्ता नाही, ‘महाथट्टा’ नक्कीच झालीय...! मुंबईतील ‘हे’ दृश्य पाहून संतापला अभिनेता हेमंत ढोमे

googlenewsNext
ठळक मुद्देहेमंतची ही पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.

कोरोनाने स्थिती बिकट झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रूग्णालयात बेड मिळत नाहीयेत. औषधांची कमतरता आहे आणि त्यातच लसींचाही तुटवडा भासतोय. सध्या 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस (Corona vaccine) दिली जात आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण लसीकरणाचे चित्र काय, तर लसीकरणासाठी अनेक ठिकाणी उन्हातान्हात, कोरोनाचा धोका पत्करत रांगा लागल्या आहेत. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. इतके करूनही लस मिळेलच याची शाश्वती नाहीये. अभिनेता  हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी याबद्दल संतप्त पोस्ट लिहिली आहे.
लसीकरण केंद्रावरची गर्दी आणि यामुळे सामान्यांना सोसावा लागत असलेला त्रास यावर भाष्य करणारी जळजळीत पोस्ट त्याने शेअर केली आहे.


 
‘सर्व नियम पाळणारा... सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणूस आता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यासाठी) रांगेत उभा आहे. उन्हा तान्हाचा कुठल्याही सावलीशिवाय. खूप वय असलेला, थकलेला! कमीत कमी १ किलोमीटर तरी... हजारो लोक आहेत गेटवर. चेंगराचेंगरी. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये..माणसाला माणसासारखं तरी वागवा..महासत्ता होणार म्हणे...महाथट्टा नक्कीच झालीय... ’ असे त्याने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

या पोस्टबाहेर लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. या फोटोंत मुंबईतील एका लसीकरण केंद्राबाहेर लोक लस मिळावी यासाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.
हेमंतची ही पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
  

Web Title: hemant dhome tweeted ON inconvenience at vaccination center in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.