hemangi kavi gives answer to her trolls | एवढी गचाळ का राहातेस असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर

एवढी गचाळ का राहातेस असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर

ठळक मुद्देया बाईने तिच्या कमेंटमध्ये लिहिले होते की, एक्सप्रेशन, डान्स वगैरे ठिक आहे... पण एवढी गचाळ का राहातेस... जरा टापटीप राहा म्हणजे आम्हाला बघावेल हा व्हिडिओ... प्लीज

हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. तिने नुकताच तिच्या व्हिडिओवर एका बाईने दिलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला असून त्याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

हेमांगीने एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिले आहे की, या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई!  नक्की कुठे चाललोय आपण?vआता या comments चा भडीमार होणार... ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये! ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!

या बाईने तिच्या कमेंटमध्ये लिहिले होते की, एक्सप्रेशन, डान्स वगैरे ठिक आहे... पण एवढी गचाळ का राहातेस... जरा टापटीप राहा म्हणजे आम्हाला बघावेल हा व्हिडिओ... प्लीज

या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण? आता या...

Posted by Hemangi Kavi-Dhumal on Saturday, April 10, 2021

या बाईचे बोलणे अतिशय चुकीचे असल्याचे नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत आणि या चुकीच्या गोष्टीला लोकांसमोर आणून दिल्याबद्दल तिचे आभार मानत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hemangi kavi gives answer to her trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.