नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? त्याचं ते वाक्य ऐकून प्रिया बापट सुन्न झाली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:00 AM2021-09-08T08:00:00+5:302021-09-08T08:00:01+5:30

प्रिया बापटनं सांगितला किस्सा ... किस्सा लग्नानंतर एक -दोन वर्षानंतरचा...

He asked me if I was ashamed to name my husband. Priya Bapat told that story | नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? त्याचं ते वाक्य ऐकून प्रिया बापट सुन्न झाली...!!

नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? त्याचं ते वाक्य ऐकून प्रिया बापट सुन्न झाली...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्

प्रिया बापट (Priya Bapat ) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडतं जोडपं. दोघंही गुणी कलाकार. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 साली प्रिया आणि उमेश कामत लग्नबेडीत अडकले. पण प्रिया बापटची प्रिया कामत झाली नाही. होय, लग्नानंतर मुलीच्या नावात बदल करण्याची प्रथा असताना प्रिया व उमेश दोघांनीही या प्रथेला फाटा दिला. अलीकडे एका मुलाखतीत प्रिया नेमक्या याच विषयावर बोलली. या मुलाखतीत तिनं एक किस्साही ऐकवला.

तर किस्सा लग्नानंतर एक -दोन वर्षानंतरचा. तर एकदा काय झालं की, उमेशच्या नावाचं कुरिअर आलं.  प्रिया घरात होती. तिनं दारं उघडलं.  दार उघडताच, उमेश कामत यांचं पार्सल आहे. बँकेतून आलंय, असं तो कुरिअरवाला म्हणाला. यावर, द्या ते पार्सल, मी देईल त्याला, असं प्रिया त्याला म्हणाली. पण  त्या कुरिअरवाल्याचं समाधान झालं नसावं. त्यानं चौकशी सुरू केली. तुमचं नाव?  प्रियानं त्याला तिचं नाव सांगितलं. यावर त्यानं तिच्याकडं ओळखपत्राची मागणी केली. इतकंच नाही, उमेश आणि तुमचं नातं काय? वरून हा त्याचा प्रश्नही तयार होताण्. मी त्याची बायको, असं प्रियानं सांगितल्यावर तो कुरिअरवाला अचानक प्रियावर बरसलाचं. ‘तुम्हाला नव-याचं नाव लावायची लाज वाटते का? आजकालच्या मुलींची फॅशन झाली आहे का तशी? ,’ असं तो म्हणाला. तो बोलत होता अन् प्रिया त्याच्याकडे नुसती थक्क होऊन बघत राहिली. ती सुन्न झाली.

हा किस्सा सांगत प्रियानं लग्नानंतर नाव न बदलण्यामागचं कारण सांगितलं. तीे म्हणाली, ‘मला वाटतं मी फक्त माझ्या नावामुळे ओळखली जात नाहीये. मी माझ्या अभिनयामुळे ओळखली जाते. त्यामुळे मी प्रिया बापट आहे, प्रिया शरद बापट आहे किंवा प्रिया कामत आहे यानं काय फरक पडतोय. लग्न झाल्याने माझ्या करिअरवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अर्थात आपल्या समाजात अनेक मान्यता आहेत, त्या नक्कीच आडव्या आल्यात.  मी नाव बदलले काय नि नाही बदलले काय, याने त्या कुरिअरवाल्याला काहीही फरक पडण्याची गरज नव्हती. पण मी नाव बदलावं ही त्याची मानसिकता होती. त्याचा स्वत:चा विचार होता. मी तो कसा बदलणार होती?’आपण सगळं बदलू शकतो पण एखाद्याची विचार करण्याची पद्धत बदलू शकत नाही.’

Web Title: He asked me if I was ashamed to name my husband. Priya Bapat told that story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.