मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

अनिकेत विश्वासरावस्नेहा चव्हाण यांना शुभेच्छा देत त्यांच्या लग्नातील फोटो अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने शेअर केला आहे.

तर स्नेहा चव्हाणने लग्नातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसेच स्नेहाने मेंहदी व हळद सेरेमनीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या दोघांचा ५ ऑगस्टला पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला होता. हा साखरपुडा देखील कोणताही गाजावाजात न करता केला होता. त्यावेळी याबाबत स्नेहाला विचारले असता ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.

Web Title: Have you seen these photos of Aniket Vishwasrao and Sneha Chavan's wedding ceremony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.