Alka Kubal यांच्या मुलींचे फोटो पाहिलेत का ? सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:00 AM2021-12-19T09:00:00+5:302021-12-19T09:00:00+5:30

अलका कुबल (Alka Kubal) आणि समीर आठल्ये यांचे लव्हमॅरेज आहे. समीर आठल्ये सिनेमेटोग्राफर आहेत.सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे दोघांची पहिली भेट झाली होती. दोघांचे मैत्री झाली तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली.

Have you checked Alka Kubal's Daughter pictures. She's no less than any actress in terms of Beauty | Alka Kubal यांच्या मुलींचे फोटो पाहिलेत का ? सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर

Alka Kubal यांच्या मुलींचे फोटो पाहिलेत का ? सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर

googlenewsNext

बी-टाऊन असो किंवा मग मराठी इंडस्ट्री स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही.मात्र असेही काही कलाकारांची मुलं आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्र नाही तर करिअरसाठी दुसरेच क्षेत्र निवडले आहे.  यात अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांच्या मुलींचा विशेष उल्लेख करावा लागेल.


अलका कुबल आणि समीर आठल्ये यांचे लव्हमॅरेज आहे. समीर आठल्ये सिनेमेटोग्राफर आहेत.सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे दोघांची पहिली भेट झाली होती. दोघांचे मैत्री झाली तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली. अलका कुबल यांना दोन मुली आहेत.इशानी आणि कस्तुरी अशा या दोन्ही मुलींची नावं आहे. जिथे आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलंसुद्धा अभिनय क्षेत्रात नशीब आजमवत आहेत. अशात अलका कुबल यांच्या मुली मात्र अभिनय क्षेत्रा व्यतिरिक्त हटके काम करत आहेत. मुलींनीसुद्धा आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम केले असावे असे अनेकांना वाटेल. पण त्यांच्या दोन्ही मुलींनी अभिनयापेक्षा दुसरेच क्षेत्रात करिअर बनवले आहे. 

दोन्ही मुली दिसायलाही फार सुंदर आहेत. त्यांचे विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील. इशानी वयाच्या २३ व्या वर्षी पायलट बनली. इशानीचे लग्न झाले आहे.इशानीचे पतीसुद्धा पायलट आहेत. लहानपणापासून इशानीला वैमानिक व्हायचं होतं आणि २०१५ मध्ये तिला वैमानिकाचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं. निशांत वालिया असे तिच्या पतीचे नाव आहे.निशांत हा मुळचा दिल्लीचा राहणारा आहे. लग्नानंतर इशानी आता पती निशांतसोबत फ्लोरिडामध्ये राहते. आईप्रमाणे अभिनय कौशल्य दोन्ही मुलींमध्येही आहे .पण तरीही दोघींनीही अभिनय क्षेत्रापासून लांबच राहणे पसंत केले.


अलका कुबल या 'माहेरची साडी' सिनेमामुळे रसिकांची आवडती अभिनेत्री बनल्या होत्या. अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले.आजही अलका कुबल यांचे नाव काढताच 'माहेरची साडी' रसिकांना नाही आठवला तर नवलच.आजही माहेरची साडी सिनेमा आठवला की, अलका कुबल यांचे नाव सगळ्यात आधी घेतले जाते. 

Web Title: Have you checked Alka Kubal's Daughter pictures. She's no less than any actress in terms of Beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.