गश्मिर महाजनीचा हॅपी सन्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2017 08:05 AM2017-02-05T08:05:30+5:302017-02-05T13:41:04+5:30

आता हेच पाहा ना, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकणारा अभिनेता गश्मिर महाजनी हा कामाच्या व्यापातूनदेखील वेळ काढून सन्डेचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Happy Sunday of Gashmir Mahajan | गश्मिर महाजनीचा हॅपी सन्डे

गश्मिर महाजनीचा हॅपी सन्डे

googlenewsNext
रत्येक व्यक्तीसाठी सुट्टीचा दिवस सन्डे हा खूपच आनंदाचा असतो. हा दिवस संपूच नये असे प्रत्येकाला वाटत असते. सन्डे हा पूर्ण एन्जॉयफूल जावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांना कसला असतो सन्डे. त्यांच्यासाठी सगळेच दिवस सारखेच असतात. मात्र तरी ही आपल्या बिझी शेडयुल्डमधून वेळ काढून हे कलाकार सन्ड एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
     
        आता हेच पाहा ना, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकणारा अभिनेता गश्मिर महाजनी हा कामाच्या व्यापातूनदेखील वेळ काढून सन्डेचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गश्मिरने सोशलमीडियावर एक झक्कास डान्स व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याचप्रमाणे चित्रिकरणातून वेळ काढून थोडं आरामदायक वाटावे म्हणून हा सुपर डान्स त्याने एन्जॉय केला आहे. तो सध्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट त्याचा दाक्षिणात्य रिमेक असणार आहे. 
         
          गश्मिरने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीला वन वे तिकीट, देऊळबंद, कॅरी आॅन मराठा, कान्हा असे अनेक चित्रपट दिले आहेत. कान्हा या चित्रपटात तो वैभव तत्ववादी आणि गौरी नलावडेसोबत पाहायला मिळाला होता. अवधूत गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस ही उतरला होता. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच त्याने बॉलिवुडमध्येदेखील पदापर्ण केले आहे. डोंगरी का राजा असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तो बॉलिवुडची तगडी अभिनेत्री सनी लियोनीसोबत ठुमके लावताना पाहायला मिळाला. 


     


 

Web Title: Happy Sunday of Gashmir Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.