हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव जोडी झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:14 PM2022-05-17T19:14:42+5:302022-05-17T19:16:40+5:30

लक्षवेधी भूमिकेने सगळ्यांची मने जिंकणारे ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव सध्या अजून एका कारणामुळे चर्चेत आहे.

Half Ticket 'fame Vinayak Potdar and' Dashakriya 'fame Arya Adhav will be seen together in this marathi movie | हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव जोडी झळकणार या सिनेमात

हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव जोडी झळकणार या सिनेमात

googlenewsNext

लक्षवेधी भूमिकेने सगळ्यांची मने जिंकणारे ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव  सध्या अजून एका कारणामुळे चर्चेत आहे. गावावरचं पाण्याचं संकट दूर करण्यासाठी या दोघांनी आणि त्यांच्या छोटया मित्रमंडळींनी काय केलं? याची उत्कंठावर्धक कथा १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केली असून निर्मिती शारीक खान यांची आहे.

या चित्रपटात विनायकने ‘रघु’ तर आर्यने ‘सलमान’ ही भूमिका साकारली आहे. ‘लहानांना मोठ्ठं आणि मोठ्ठयांना परत लहान’ करणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी येणाऱ्या भीषण परिस्थितीवर आपल्या कल्पकतेने मात देणाऱ्या लहानग्यांची गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट.

आपल्या या भूमिकेबद्दल हे दोघे सांगतात की, ‘अनेकदा मोठ्यांना जे जमतं नाही ते लहान मुलं अगदी सहज करून जातात. मोठ्यांनी खरंच लहानांकडून शिकावे अशा धाटणीचा हा चित्रपट आहे’. हा चित्रपट पावसाच्या दुष्काळावर भाष्य करणारा असला तरी कोणत्याही चांगल्या कामासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार हा महत्त्वपूर्ण असल्याचे दाखवून देतो. या दोघांसोबत या चित्रपटात छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, प्रदीप नवले, चिन्मयी साळवी, प्राजक्ता वाड्ये, वैभव जीयुघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

Web Title: Half Ticket 'fame Vinayak Potdar and' Dashakriya 'fame Arya Adhav will be seen together in this marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा