GOOD NEWS! शशांक केतकरच्या घरी हलणार पाळणा

By तेजल गावडे | Published: December 25, 2020 11:48 AM2020-12-25T11:48:17+5:302020-12-25T11:49:04+5:30

अभिनेता शशांक केतकरच्या घरी देखील लवकरच पाळणा हलणार आहे. ही खुशखबर त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

GOOD NEWS! Shashank Ketkar wife is pregnant | GOOD NEWS! शशांक केतकरच्या घरी हलणार पाळणा

GOOD NEWS! शशांक केतकरच्या घरी हलणार पाळणा

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये करीना कपूर - सैफ अली खान, अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरच्या घरी देखील लवकरच पाळणा हलणार आहे. ही खुशखबर त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. त्याने ख्रिसमसच्या दिवशी ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

शशांक केतकरने पत्नीचा बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, आपल्याला नेहमी माहित आहे की सांता क्लॉज येणार आणि आपल्यावर भेटवस्तूचा वर्षाव करणार. आम्ही अनपेक्षित होतो की वास्तविकतेच आम्हाला हे गिफ्ट मिळाले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या तिघांकडून तुम्हाला शुभेच्छा.


शशांक केतकरने शेअर केलेल्या फोटोत तो आणि त्याची पत्नी खूप खूश दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसोबत त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शशांकने दुसरे लग्न करत आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली. पेशाने वकील असणाऱ्या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला. वैवाहिक जीवनात खूप खुश असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.


शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. तसेच सुखांच्या सरींनी हे मन बावरे, इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेत त्याने काम केले आहे. मालिकेशिवाय त्याने 31 दिवस, आरॉन, वन वे तिकिट या चित्रपटात काम केले आहे. तसेच पूर्णविराम आणि गोष्ट तशी गंमतीची या नाटकातही त्याने काम केले आहे.

Web Title: GOOD NEWS! Shashank Ketkar wife is pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.