खुशखबर..! प्रिया बापट आणि उमेश कामतने या लोकप्रिय सीरिजच्या शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:09 PM2021-03-09T16:09:30+5:302021-03-09T16:10:14+5:30

पुन्हा एकदा प्रिया बापट आणि उमेश कामतची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Good news ..! Priya Bapat and Umesh Kamat started shooting for this popular series | खुशखबर..! प्रिया बापट आणि उमेश कामतने या लोकप्रिय सीरिजच्या शूटिंगला केली सुरूवात

खुशखबर..! प्रिया बापट आणि उमेश कामतने या लोकप्रिय सीरिजच्या शूटिंगला केली सुरूवात

googlenewsNext


अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांची लोकप्रिय सीरिज आणि काय हवेच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे. आणि काय हवे या सीरिजमध्ये प्रिया आणि उमेश विवाहित जोडपे असून जई आणि साकेत असे त्यांच्या पात्रांचे नाव आहे. 


जुई आणि साकेत यांच्या नात्याची सुवर्ण आणि गोड सफर पुन्हा कधी अनुभवायला मिळेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता आणि तोच दूर करायला एम एक्स प्लेअर या वेबसिरीज तिसरे पर्व घेऊन येणार आहे. या तिसऱ्या पर्वाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.


प्रिया बापटने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आणि काय हवं...?सीझन ३. आजपासून शूटिंगला सुरूवात झाली. ज्या दिवसाची आपण सगळे वाट पाहत होतो. 
तर उमेश कामतने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, येस. अखेर चित्रीकरणाला सुरूवात झाली. आणि काय हवं? तिसरा सीझन.

 

वरून नार्वेकर दिग्दर्शित ६ भागांच आणि काय हवं? सीझन २ मध्ये जुई आणि साकेतच्या लग्नानंतर आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींचा प्रवास. लग्नानंतर नातं घट्ट होत असताना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींच्या या सफरीचा गोडवा दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता तिसऱ्या भागात नेमके काय पहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रिया आणि उमेशचे चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Good news ..! Priya Bapat and Umesh Kamat started shooting for this popular series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.