वैभव तत्ववादीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, दिसणार या हिंदी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:00 AM2020-12-09T06:00:00+5:302020-12-09T06:00:00+5:30

वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

Good news for the fans of Vaibhav Tattvavadi, He will be seen in Hindi movie | वैभव तत्ववादीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, दिसणार या हिंदी चित्रपटात

वैभव तत्ववादीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, दिसणार या हिंदी चित्रपटात

googlenewsNext

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्ववादी त्याच्या चित्रपट व भूमिकेमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.

नुकताच वैभव तत्ववादीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आहे. त्याने अभिनेत्री अंजली पाटीलसोबतचा फोटो शेअर करत सांगितले की, नवीन हिंदी चित्रपटाबद्दल सांगण्यास आनंद होतो आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने, तुमची लाडकी अभिनेत्री अंजली पाटील आणि ऑटमन ब्रीझ फिल्म्स निर्मित हा चित्रपट आहे. 


वैभव तत्ववादी याने या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल सांगितले नाही. मात्र मुहूर्ताच्या पाटीवर प्रोजेक्ट १ असे शीर्षक देण्यात आले आहे. या चित्रपटाच्या कथानकाबद्दल काहीही समजू शकलेले नाही. चित्रपटातील फोटो पाहून ही लव्हस्टोरी असल्याचा अंदाज येतो आहे. 


या चित्रपटाशिवाय वैभव तत्वावदी त्रिभंगा या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा व त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवले जाणार आहेत.


तसेच वैभव मराठी चित्रपट 'पाँडिचेरी'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे. या सिनेमात सई व वैभव तत्त्ववादीसोबत अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी दिसणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.

सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

Web Title: Good news for the fans of Vaibhav Tattvavadi, He will be seen in Hindi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.