दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:30 AM2020-02-11T11:30:13+5:302020-02-11T11:30:24+5:30

अभिनयासोबतच गौरी नलावडेला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.

Gauri Nalawade Enjoying Vacation At Dubai See Her Glamorous Pics | दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ?

दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ?

googlenewsNext

अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले.सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे इतर अभिनेत्रींप्रमाणे गौरी नलावडेही लक्षवेधी ठरत आहे. अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.  

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतंच तिने शेअर केलेले काही फोटोंना तिचे चाहते पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. गौरी नलावडे सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.


 इन्स्टाग्राम अकाउंटवर गौरीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. दुबई, अबुधाबीच्या निसर्गरम्य लोकेशन्सना तिने भेट देत फोटो कॅम-यात कॅप्चर केले आहे. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर फोटो काढण्याच आनंद लुटताना पाहायला मिळतंय.

Web Title: Gauri Nalawade Enjoying Vacation At Dubai See Her Glamorous Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.