सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार गश्मीर महाजनी, विशेष पथकाचा भाग असणार गश्मीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:17 PM2019-08-28T12:17:02+5:302019-08-28T12:18:48+5:30

विविध घोटाळे आणि गैरव्यवहार या शोमधून समोर येणार आहेत. याच घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या पथकाचा गश्मीर भाग असेल.

Gashmeer Mahajani To Star In Salman khan’s Upcoming Project | सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार गश्मीर महाजनी, विशेष पथकाचा भाग असणार गश्मीर

सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार गश्मीर महाजनी, विशेष पथकाचा भाग असणार गश्मीर

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. आपल्या अभिनयानं मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. त्यातच प्रत्येक कलाकाराचं बॉलीवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या खानसह काम करायला मिळालं तर सोन्याहून पिवळं. हाच सुवर्णक्षण आता गश्मीर महाजनीच्या करिअरमध्ये आला आहे. गश्मीर महाजनी आता दबंग सलमान खानच्या ‘स्पेशल ऑपरेशन्स टीम’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.  विविध घोटाळे आणि गैरव्यवहार या शोमधून समोर येणार आहेत. याच घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या पथकाचा गश्मीर भाग असेल. याआधी 'गश्मीर कॅरी ऑन मराठा', 'कान्हा', 'डोंगरी का राजा' आणि 'देऊळबंद' या चित्रपटात झळकला आहे.


दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने त्याच्या कामाविषयी सांगितले होते तेव्हा तो म्हणाला होता की, मला काम करताना क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शननं झालं नाही की, मला त्याचा त्रास होतो. दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मतं आहे.त्यानुसार मला सगळ्या गोष्टी मिळाल्या की काम आणखीन उत्तम होते. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं? त्यामुळे मी खूप खूश असल्याचे त्याने सांगितले होते. 

Web Title: Gashmeer Mahajani To Star In Salman khan’s Upcoming Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.