In front of the new movie 'Khichak', the poster will appear, 'This' will be displayed on the date | नवीन सिनेमा 'खिचिक' चित्रपटाचे पोस्टर आले समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित
नवीन सिनेमा 'खिचिक' चित्रपटाचे पोस्टर आले समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

मराठी सिनेमांमध्ये दिवसेंदिवस वेगवेळे प्रयोग करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. असाच एक प्रयोग आणखी एका सिनेमात करण्यात आला आहे. सिनेमाचे टायटल 'खिचिक' यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, या टायटलमुळे काही तरी गुढ, गुपित असणार हे स्पष्ट होते.  
अतिशय वेगळ्या नावामुळे "खिचिक" या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, लक्ष वेधून घेणारं हे पोस्टर आहे. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असं हे पोस्टर असून नेहमीच्या धाटणीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळं दिसत असल्यानं 'खिचिक' लक्षवेधी ठरत आहे.


अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे,  रसिका चव्हाण ,यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे सिनेमात कलाकारांच्या गेटअपमध्ये प्रयोग कऱण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि प्रथमेश दोघांचा लूक तुम्हाल रेट्रो टचमध्ये दिसेल.  योगेश कोळी यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून गुरु ठाकूर आणि दत्ता यांनी लिहिलेल्या गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे. 


 चित्रपटाच्या नावातून हा सिनेमा कोणत्या विषयावर आधारित आहे हेच स्पष्ट होत नसून फक्त सिनेमाच्या टायटलमुळेचित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Web Title: In front of the new movie 'Khichak', the poster will appear, 'This' will be displayed on the date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.