पहिल्यांदाच एकत्र झळकणार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत, अशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:19 PM2020-01-08T14:19:14+5:302020-01-08T14:23:48+5:30

‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांची ही दोन भिन्न जगे आहेत.”

For the first time Gashmir Mahajani and Pooja Sawant Seen Together In Bonus Marathi Movie | पहिल्यांदाच एकत्र झळकणार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत, अशी असणार भूमिका

पहिल्यांदाच एकत्र झळकणार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत, अशी असणार भूमिका

googlenewsNext

सौरभ भावे दिग्दर्शित  ‘बोनस’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे मध्यवर्ती भूमिकेत आहेत. या सिनेमाचे नुकतेच पोस्टर लॉन्च करण्यात आले आहेत. हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. हे दोघेही या पार्श्वभूमीवर अगदी रोमँटीक अशा पोजमध्ये उभे आहेत. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. या पोस्टरमुळे या सिनेमाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.


सौरभ भावेने सांगितले की, “बोनस म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. पण दुर्दैवाने काहींना हे भाग्य लाभते आणि त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतात तर काहींना यातील काहीच मिळत नाही. ‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांची ही दोन भिन्न जगे आहेत.” बोनस ही एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. ही कथा त्याच्या वयात येण्याची आहे.


“सिनेमाच्या नावावरून हा सिनेमाची कथा धैर्य आणि धाडसाची तसेच धुंडाळलेल्या वेगळ्या पायवाटेची आहे. आम्ही याआधीच्या सिनेमांमधून भक्कम कथा आणि उत्तम कलाकारांची जी परंपरा निर्माण केली आहे, तिच या सिनेमामधूनही अधोरेखित होईल,” असेही सांगितले. येत्या 28 फेब्रुवारीला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 

Web Title: For the first time Gashmir Mahajani and Pooja Sawant Seen Together In Bonus Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.