अखेर ही मराठमोळी अभिनेत्री भेटली नवऱ्याला, लॉकडाउनमुळे झाली होती ताटातूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:14 PM2020-05-07T19:14:49+5:302020-05-07T19:15:20+5:30

लॉकडाउनमुळे ही अभिनेत्री नवऱ्यापासून दुरावली होती.

Finally, the Marathi actress met her husband, who had broken up due to lockdown TJL | अखेर ही मराठमोळी अभिनेत्री भेटली नवऱ्याला, लॉकडाउनमुळे झाली होती ताटातूट

अखेर ही मराठमोळी अभिनेत्री भेटली नवऱ्याला, लॉकडाउनमुळे झाली होती ताटातूट

googlenewsNext

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत. अशात नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. क्वारांटाईन झालेला कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत.

क्वारंटाईनमुळे प्रार्थना तिच्या माहेरी म्हणजेच वडोदरा येथे होती. त्यावेळी तिच्यासोबत तिथे नवरा नव्हता. त्या दोघांमध्ये ताटातूट झाली होती. मात्र आता ती मुंबईत परतली असून अखेर ती तिच्या नवऱ्याला भेटली आहे. प्रार्थना बेहरे हिने नवऱ्यासोबतचा फोटो नुकताच शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने नवऱ्याला भेटल्याचे सांगितले. 

यापूर्वी प्रार्थनाने मुंबईत परवानगी मिळाली असून मुंबईत येत असल्याचे सांगितले होते.

या पोस्टच्या आधी तिने नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले होते की, जेव्हा मी तुला मिस करते तेव्हा मी आपले जुने संभाषण वाचते. जुने फोटो पाहते. वेड्यासारखी हसते. गाणी ऐकते जी मला तुझी आठवण करून देतात. तेव्हा मी तुला आणखीन मिस करते.

प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत झाले आहे.अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.

Web Title: Finally, the Marathi actress met her husband, who had broken up due to lockdown TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.