Ganesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:24 PM2018-09-21T16:24:29+5:302018-09-22T08:30:00+5:30

निखिल हा कामानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील कसबा पेठेत तो लहानाचा मोठा झाला आहे. अनेक वर्षं त्याच्या पुण्याच्या घरी गणरायाचे आगमन होत होते. पण यंदा त्याने त्यांच्या मुंबईतील घरी गणपती बाप्पा आणला आहे.

Farzand fame nikhil raut celebrates ganeshotsava in his family | Ganesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला

Ganesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला

googlenewsNext

फर्जंद या चित्रपटातील निखिल राऊतने साकारलेली किस्ना ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच चॅलेंज या त्याच्या नाटकाला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या नाटकाला मिळालेल्या या यशामुळे निखिल राऊत सध्या चांगलाच खुश आहे. निखिल हा कामानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील कसबा पेठेत तो लहानाचा मोठा झाला आहे. अनेक वर्षं त्याच्या पुण्याच्या घरी गणरायाचे आगमन होत होते. पण यंदा त्याने त्यांच्या मुंबईतील घरी गणपती बाप्पा आणला आहे. त्याच्याकडे दहा दिवस गणपती बाप्पा असणार आहे. निखिल वर्षभर कामात कितीही व्यग्र असला तरी गणपतीच्या दहा दिवसांत तो काम न करता केवळ गणरायाची सेवा करतो. 

निखिल राऊतकडे गेल्या 25 वर्षांपासून गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. त्याच्या गणपती बाप्पाविषयी तो सांगतो, आमच्या संपूर्ण राऊत कुटुंबात कोणाकडेच गणपती नव्हता. त्यामुळे मी लहान असताना आपल्याकडे देखील गणपती असावा असे मला नेहमीच वाटत असे. त्यामुळे मी माझ्या आई-वडिलांकडे हट्ट केला की, आपल्या घरी देखील आपण गणपती बाप्पाला आणूया... त्यामुळे आमच्याकडे देखील गणपती बाप्पा आणायला आम्ही सुरुवात केली.

लहानपणापासूनच गणपतीची आरास करणे, मखर बनवणे ही कामं मीच करतो. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या कित्येक दिवस आधी पासून मी गणरायाच्या तयारीला सुरुवात करतो. लहान असताना तर मी अनेक रात्र बसून मखर बनवत असे. गणपतीची सजावट साधी आणि सुटसुटीत असण्याकडे माझा कल असतो. तसेच मी नेहमीच शाडूची मूर्ती घरात बसवतो. सण साजरा करताना कोणत्याही पद्धतीने प्रदूषणाची हानी झाली नाही पाहिजे असा दरवर्षी प्रयत्न करतो. गणपतीच्या दिवसांत आमचे घर पूर्णपणे लोकांनी भरलेले असते. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पुण्याच्या घरातच गणपतीचे आगमन होते. पण आज गणरायाच्या कृपेने मुंबईसारख्या शहरात मला घर घेता आले आहे. त्यामुळेच मी यंदा गणपती बाप्पाला माझ्या या नवीन घरात आणले आहे. 

Web Title: Farzand fame nikhil raut celebrates ganeshotsava in his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.