'कुणी तरी येणार, येणार गं...!', ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:50 PM2021-11-26T17:50:20+5:302021-11-26T17:50:59+5:30

मराठमोळ्या या अभिनेत्रीचं नुकतंच डोहाळे जेवण पार पडले.

This famous Marathi actress will soon become a mother | 'कुणी तरी येणार, येणार गं...!', ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई

'कुणी तरी येणार, येणार गं...!', ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील या वर्षभरात बऱ्याच कलाकारांच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. त्यात आता विनोदी अभिनेत्री म्हणून परिचित असलेली प्राजक्ता हनमघर हीदेखील लवकरच आई बनणार असल्याचे समजते आहे. नुकतेच तिचे डोहाळ जेवण पार पडले. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो पाहायला मिळतो आहे. साधारण ४ वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला. रजत ढाळे हे फार्मसिस्ट आहेत.  


अभिनेत्री प्राजक्ताचे बालपण मुंबईतच गेले दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले. प्राजक्ता हनमघर हिची विनोदाची शैली प्रेक्षकांना खूपच भावली आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून तिने साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच आवडल्या होत्या.


एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील सोनियाच्या पात्रामुळे ती घराघरात पोहचली.  वादळवाट, पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारत असताना तिने लूज कंट्रोल, वेडिंगचा शिनेमा, धुरळा हे चित्रपट तसेच डब्बा गुल, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, फु बाई फु सारखे विनोदी कार्यक्रम आपल्या विनोदी अभिनयाने तिने गाजवले . योगेश शिरसाट आणि प्राजक्ताची जोडी त्यांच्या विनोदी स्किटमधून प्रेक्षकांना खूपच आवडली होती. अभिनयाबरोबरच प्रजक्ताने काही कुकरी शो होस्ट केले आहेत त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे हे तिचे आवडीचे काम आहे.  बस्ता या चित्रपटात तिने साकारलेली काहीशी विरोधी भूमिका देखील खूपच लक्षवेधी ठरली होती. १ एप्रिल २०२२ रोजी प्रजक्ताचा हवाहवाई हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: This famous Marathi actress will soon become a mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.