Exclusive मधुरा देशपांडे आणि शरद पोंक्षे पुन्हा एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 02:29 PM2016-12-07T14:29:07+5:302016-12-07T14:29:07+5:30

 बेनझीर जमादार          कन्यादान या मालिकेतील मधुरा देशपांडे आणि शरद पोंक्षे पुन्हा एकत्रित पाहायला मिळणार आहे. ...

Exclusive Madhura Deshpande and Sharad Ponkshe reunited | Exclusive मधुरा देशपांडे आणि शरद पोंक्षे पुन्हा एकत्रित

Exclusive मधुरा देशपांडे आणि शरद पोंक्षे पुन्हा एकत्रित

googlenewsNext
 बेनझीर जमादार

        
कन्यादान या मालिकेतील मधुरा देशपांडे आणि शरद पोंक्षे पुन्हा एकत्रित पाहायला मिळणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील शरद पोंक्षे यांची कडक असणाºया वडिलांची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचबरोबर शरद पोंक्षे व मधुरा यांची बाप-बेटीची ही जोडी छोटया पडदयावरदेखील हीट झाली होती. आता हीच जोडी प्रेक्षकांना पुन्हा बसस्टॉप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी मधुरा लोकमत सीएनएक्सला सांगते, मी या चित्रपटात एका कॉल सेंटरमध्ये काम करणाºया मुलीची भूमिका साकारली आहे. ती एका मुलाच्या प्रेमात पडते. मात्र ज्या मुलाच्या प्रेमात पडते तो मुलगा तिच्या योग्य नसतो. मात्र तिच्या प्रेमापोटी तो मुलगा कसा योग्य वळणावर येतो अशी ही कथा असणार आहे. माझ्यासोबत या चित्रपटात अभिनेता हेमंत ढोमे असणार आहे. हेमंतसोबत काम करताना खूप मजा आली. चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्याचा जो कॉमेडीचा टाईम जुळुन येतो तो खूप भारी असतो. या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी खूप मजा केली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता शरद पोंक्षेदेखील आहे. त्यांच्यासोबत मी कन्यादान या मालिकेत काम केले होते. आता या चित्रपटातदेखील पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. मात्र या चित्रपटात ते माझे वडिल नसून हेमंतचे वडिल दाखविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत एकच दिवस चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. मात्र खरचं  त्या एका दिवसाचादेखील खूप आनंद झाला आहे. या चिटपटाच्या चित्रिकरणाला खूप धमाल केली आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, पूजा सावंत, सिध्दार्थ चांदेकर, अनिकेत विश्वासराव या कलाकारांचादेखील समावेश आहे. 

 








 


 

Web Title: Exclusive Madhura Deshpande and Sharad Ponkshe reunited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.