'टकाटक' चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रथमेश परबला त्याची ही चूक पडली चांगलीच महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 07:15 AM2019-06-28T07:15:00+5:302019-06-28T07:15:00+5:30

‘टकाटक’च्या चित्रपटातून प्रथमेश 'गण्या' ह्या भूमिकेच्या माध्यमातून समोर येणार म्हटल्यावर त्याचा पुन्हा तोच उत्साह पाहायला मिळणार आहे.

During the shooting of Takatak, Prathamesh Parab did a mistake, | 'टकाटक' चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रथमेश परबला त्याची ही चूक पडली चांगलीच महागात

'टकाटक' चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रथमेश परबला त्याची ही चूक पडली चांगलीच महागात

googlenewsNext

अभिनेता प्रथमेश परबने ‘बालक पालक’चा विशु , किंवा ‘टाइमपास’चा दगडु सारख्या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली . प्रथमेश परब आता लवकरच आगामी ‘टकाटक’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. ‘टकाटक’च्या चित्रपटातून प्रथमेश 'गण्या' ह्या भूमिकेच्या माध्यमातून समोर येणार म्हटल्यावर त्याचा पुन्हा तोच उत्साह पाहायला मिळणार आहे. पण एका सीनवेळी त्याची एक चुक त्याला चांगलीच महागात पडली आहे.
‘टकाटक’च्या चित्रीकरणावेळी एका सीनमध्ये प्रथमेशला उसाचा रस प्यायचा होता. प्रथमेशने चित्रीकरणावेळी एका घोटात रस प्यायला खरा. पण नंतर काही कारणामूळे रिटेक वर रिटेक होऊ लागले. त्यावेळी सीन चांगला व्हावा म्हणून प्रथमेश दरवेळी एका घोटात पूर्ण उसाच्या रसाचा ग्लास संपवत होता. असं करता-करता प्रथमेशने लागोपाठ 8 ते 9 ग्लास उसाचा रस प्यायला. ज्यामूळे थोड्यावेळातच त्याला उलट्या सुरू झाल्या. आणि तो आजारी पडला.


याविषयी प्रथमेश म्हणाला, “हो, आम्ही खूप उन्हाळ्यात चित्रीकरण करत होतो. दूपारचे जेवण झाल्यावर आम्ही त्या सीनच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. अगोदरच माझे पोट भरले होते. त्यात लागोपाठ 8 ते 10 ग्लास रस पोटात गेल्यावर मग मात्र मला मळमळायला सुरूवात झाली. चित्रीकरण सुरू होते. म्हणून सुरूवातीला मी काही बोललो नाही. पण नंतर मात्र माझ्या उलट्या सुरू झाल्या आणि मी आजारी पडलो.”


प्रथमेश परब पूढे सांगतो, “जेव्हा त्या सीनविषयी चर्चा झाली. तेव्हा मला तो सीन करताना एका घोटात उसाचा रस संपवायचाय, असे मी इम्प्रोवायझेशन करायचे ठरवले होते. जेव्हा मला ही कल्पना सुचली तेव्हा हे लक्षात आले नाही, की समजा रिटेक झाले तर ह्याचे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात.

मी सीनमध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झालो की, किती रिटेक होत होते, आणि मी किती ग्लास पित होतो, ह्याकडे लक्षच नव्हते. आता तो सीन बघताना खूप छान वाटतं. पण तेव्हा मात्र परफेक्शनच्या नादात चांगलाच आजारी पडलो होतो. 

Web Title: During the shooting of Takatak, Prathamesh Parab did a mistake,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.