डॉ. अमोल कोल्हे यांनी केली ही मोठी घोषणा, सध्या सोशल मीडियावर रंगलीय याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 01:30 PM2019-12-19T13:30:54+5:302019-12-19T13:55:42+5:30

डॉ. अमोल कोल्हे एक मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

dr. amol kolhe's jagdamb creations will produce three Movies | डॉ. अमोल कोल्हे यांनी केली ही मोठी घोषणा, सध्या सोशल मीडियावर रंगलीय याचीच चर्चा

डॉ. अमोल कोल्हे यांनी केली ही मोठी घोषणा, सध्या सोशल मीडियावर रंगलीय याचीच चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. अमोल कोल्हे यांनी घोषणा केली आहे की, जगदंब क्रिएशन्स तीन चित्रपटांची निर्मिती करणार असून शिवप्रताप वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशी त्यांची निर्मिती असलेल्या तीन चित्रपटांची नावं असून हे तिन्ही चित्रपट शिवकालीन असणार आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते आणि निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी 14 डिसेंबरला फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ते लवकरच म्हणजेच 18 डिसेंबरला एक मोठी घोषणा करणार असे त्यांनी लिहिले होते. डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार असल्याने ते कोणती घोषणा करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. त्यांच्या या फेसबुक पोस्टनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तसेच या पोस्टमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण देखील आले आहे. पण आता डॉ. अमोल कोल्हे यांनी ही मोठी घोषणा केल्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या घोषणेमुळे त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे यात काहीच शंका नाही. त्यांच्या जगदंब क्रिएशन्सच्या अंतर्गत तीन चित्रपटांची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात घोषणा केली आहे की, जगदंब क्रिएशन्स तीन चित्रपटांची निर्मिती करणार असून वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशी त्यांची निर्मिती असलेल्या तीन चित्रपटांची नावं असून हे तिन्ही चित्रपट शिवकालीन असणार आहे. त्यातील वाघनखं हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2020 ला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. वाघनखं या चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला असून प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या टीझरला मिळत आहे.

Web Title: dr. amol kolhe's jagdamb creations will produce three Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.